अमेरिकेत बुधवारी सकाळी आणखी एक विमान अपघात झाला असल्याची बातमी समोर येत आहे. अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विमान अपघाताच्या घटना वाढत आहेत.
दरम्यान, बुधवारी सकाळी दक्षिण एरिझोनामध्ये दोन लहान विमानांची हवेत धडक झाली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या वेळी विमानात 2-2 लोक होते. यापैकी दोनजण जखमी असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर सध्या तपास सुरु असून, हा अपघात कसा झाला याचा शोध घेतला जात आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळाने केलेल्या प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की, बुधवारी सकाळी धावपट्टी दोन विमानं लँडिंग करत होते. लँडिंगच्या वेळी दोन्ही विमान एकमेकांना धडकले व जमिनीवर कोसळले. यावेळी एक विमानाला आग लागली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला.
राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळाने अपघाताची चौकशी सुरू केली असून, स्थानिक अधिकारी आणि तपास अधिकाऱ्यांची पथके हा अपघात कसा झाला आणि यामागे काही मानवी चूक आहे का? की तांत्रिक दोष होता? हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
गेल्या काही दिवसांत 4 मोठ्या विमान अपघातांची नोंद
वॉशिंग्टन डी. सी. येथे अमेरिकन एअरलाइन्सच्या प्रवासी विमानाला हेलिकॉप्टरने धडक दिल्यानंतर काही आठवड्यांनंतर हा अपघात झाला आहे. गेल्या काही आठवड्यांत अमेरिकेत चार मोठे विमान अपघात झाले आहेत. सर्वात अलीकडील घटनेत डेल्टा जेट अपघाताचा समावेश होता जो टोरंटोमध्ये उतरत असताना अचानक उलटला. या घटनेत 80 जणांचा मृत्यू झाला होता.
तर अलास्कामध्ये, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वॉशिंग्टन, डीसी येथे अमेरिकन एअरलाइन्सचे प्रवासी विमान आणि लष्कराचे हेलिकॉप्टर यांच्यात झालेल्या टक्करमध्ये 67 लोकांचा मृत्यू झाला.
6 फेब्रुवारी रोजी अलास्कामध्ये 10 लोकांना घेऊन जाणारे एक छोटे विमान कोसळले. या अपघातात सर्वांचा अपघातात मृत्यू झाला. अलास्का सार्वजनिक सुरक्षा विभागाने मृत्यूची पुष्टी केली होती. तसेच 10 फेब्रुवारी रोजीॲरिझोनामधील स्कॉट्सडेल विमानतळावर दोन खाजगी विमानांची टक्कर झाली, ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले.