‘स्वरा भास्कर यांना कुठे काय बोलायचं याचं तारतम्य उरलं नाही हे नक्की. दिल्लीमध्ये चेंगराचेंगरी होऊन दुर्दैवी मृत्यू झाले ही घटना खरंच क्लेशदायक होती आणि आहे. पण त्या घटनेचा आमच्या राजाशी सांगड घालण्याची काहीही गरज नव्हती. स्वरा भास्कर, आमचे छत्रपती संभाजी राजे हे काल्पनिक नव्हते. त्यांच्यावरती क्रूर अत्याचार करणारा औरंग्यादेखील काल्पनिक नव्हता हे तर तू मान्य करशीलच. त्यामुळेच आमच्या राजावरती होणारे अत्याचार पाहून प्रत्येक संवेदनशील मनाला त्रास झाला आणि त्या औरंग्याचा प्रचंड राग आला. त्यामुळेच प्रत्येक भारतीयाला हा इतिहास समजायलाच हवा, जो तुमच्यासारख्या निष्ठूर आणि मेलेल्या मनाच्या लोकांनी सोयीने बदलला. आजही जेव्हा सत्य समोर येतंय, खरा इतिहास लोकांना कळतोय, तेव्हा तुम्हाला आणि तुमच्यासारख्या अनेकांना पोटशूळ का होतोय? हे समस्त भारतीयांना चांगलंच उमगलंय. त्यामुळेच आमच्या महाराजांबद्दल गरळ ओकणं बंद कर. तुमच्या सारख्या मुर्दाड मनाच्या लोकांची आता कीव येऊ लागली आहे. असं म्हणत भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी अभिनेत्री स्वरा भास्करला चांगलेच सुनावले आहे.
स्वरा भास्कर यांना कुठे काय बोलायचं याचं तारतम्य उरलं नाही हे नक्की…
दिल्लीमध्ये चेंगराचेंगरी होऊन दुर्दैवी मृत्यू झाले ही घटना खरंच क्लेशदायक होती .. आणि आहे.
पण त्या घटनेचा आमच्या राजाशी सांगड घालण्याची काहीही गरज नव्हती.
स्वरा भास्कर आमचे छत्रपती संभाजी राजे हे…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 20, 2025
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हीने नुकतंच छावा चित्रपटाबाबत एक वक्तव्य केले होत. छत्रपत्री शिवाजी महाराजांची जयंती राज्यासह देशभरात उत्साहात साजरी होत असताना स्वरा भास्कर हिने एक ट्विट केले होते. त्यात महाकुंभमेळा, दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेली चेंगराचेंगरी आणि छावा चित्रपटावरून वादग्रस्त विधान केलं होत. तिच्या या ट्विटनंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. तसंच अनेकांनी प्रतिक्रिया देत अभिनेत्रीला चांगलंच सुनावलं आहे.
अभिनेत्री काय म्हणाली होती?
अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते, ‘असा समाज जो अराजकता आणि सुव्यवस्थेच्या अभावाने ग्रस्त आहे. भयानक मृत्यूनंतर बुलडोझरने मृतदेह उचलले गेल. अशा परिस्थितीत, त्या गोष्टीवर चिंता व्यक्त न करता ५०० वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेल्या काल्पनिक अत्याचारांवर जास्त संताप व्यक्त करतोय. हा समाज मनाने आणि आत्मयाने मेलाय….’