अलीकडच्या काळात इस्राईल आणि हमास यांच्यात सुरू असलेला युद्धबंदी करार आता मोडण्याच्या मार्गावर आहे. इस्राईलने हमासवर करार मोडल्याचा आरोप करत याचा बदला घेतला जाईल असा इशारा दिला आहे.
युद्धबंदी करारानुसार हमास इस्राईली बंदकांची सुटका करत आहे त्या बदल्यात इस्राईल पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करत आहे. मात्र, आता हमासकडून हा करार मोडला गेला असलायचं इस्राईलचं म्हणणं आहे.
हमासने नुकतेच इस्राईलच्या चार बंदकांचा मृतदेह इस्राईलकडे सोपवले आहेत. पण इस्राईलच्या म्हणण्यानुसार हमासने चार पैकी एक मृतदेह हा चुकीचा पाठवा आहे. हा मृतदेह इस्राईली बंदकाचा नसून, गाझा येथील एका महिलेचा असलायचं त्यांचं म्हणणं आहे.
यानंतर इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासवर युद्धबंदी कराराचे उल्लंघन केला असायचा आरोप करत हमासला याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे.
शुक्रवारी एक निवेदन सादर करत नेतान्याहू म्हणाले आहेत की, ‘युद्धबंदी कराराचा भाग म्हणून हमासच्या अतिरेक्यांनी गुरुवारी चार मृतदेह सुपूर्द केले आहेत. इस्राईलने या मृतदेहांची तपासणी केली तेव्हा एका मृतदेहाचा डीएनएन मॅच झालेला नाही. हमासने चुकीचा मृतदेह पाठवून या कराराचे उल्लंघन केले आहे.’ असं निवेदनात सांगण्यात आलं आहे.
नेतान्याहू यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हंटले आहे की, ‘हमासने इस्राईलच्या बंदकांची निर्घृणपणे हत्या केली. त्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल.’
हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्राईलवर केलेल्या हल्ल्यादरम्यान, अनेक इस्राईली नागरिकांना बंधक बनवून ठेवले होते. त्यांचीच सूटका युद्धबंदी करारानुसार केली जात आहे.