केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. अमित शहांचा पुणे दौरा हा दोन दिवसांचा असेल. आज शाह पुण्यातील तीन कार्यक्रमांना हजेरी लावतील. या कार्यक्रमांना अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित असणार आहेत.
सकाळी आकरा वाजता कोरेगाव पार्क परीसरातील हॅाटेल वेस्टीन येथे पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गुजरात, गोवा, महाराष्ट्र या राज्यांच्या आणि दादरा नगर हवेली तसेच दिव दमन या केंद्र शासित प्रदेशातील प्रतिनिधींची सुरक्षा विषयक बैठक होणार आहे.
दुपारी तीन वाजता जनता सहकारी बँकेचा अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात हा कार्यक्रम एका कार्यक्रमाला हजेरी लावतील. त्यानंतर पाच वाजता बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रिडा संकुलात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण कार्यक्रम आणि निधीचे वितरण कार्यक्रम शहा यांच्या हस्ते होणार आहे.
दरम्यान, गृहमंत्र्यांच्या या पुणे दौऱ्याच्या निमित्ताने आज पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
विद्यापीठ चौकाकडून बाणेर रोडला जाणारी वाहतुन वळवण्यात आली आहे. तसेच मुंबई-बंगळुरू बायपासवरून बाणेरला जाणाऱ्या वाहतुकीत देखील बदल करण्यात आले आहे. पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीत देखील बदल करण्यात आले आहेत.