विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातलाय. या चित्रपटाचं सर्वच क्षेत्रातून कौतुक केलं जात आहे. तसंच हा चित्रपट बॉक्सऑफिसवर हिट ठरला आहे. दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाची दखल घेत कौतुक केलं आहे.
नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटाबद्दल देशभरात सुरू असलेल्या चर्चेवर पंतप्रधान म्हणाले, “सध्या ‘छावा’ हा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला आहे.”
पंतप्रधानांनी छावाबद्दल केलेल्या वक्तव्याला टाळ्यांच्या कडकडाट करत उपस्थितांनी दाद दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘छावा’ चित्रपटाचा उल्लेख करताच दिल्लीच्या विज्ञान भवनात जय भवानी, जय संभाजी अशा घोषणा दिल्या गेल्या. .
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून झालेल्या कौतुकानंतर अभिनेता विकी कौशलनेही इन्स्टाग्रामवर त्यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदींनी कौतुक केल्याचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे “शब्दांच्या पलीकडचा सन्मान!” आहे.
गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट मोठा चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चिपत्राचे अनेकजण कौतुक करत आहेत. या चित्रपटाने आत्तापर्यंत जगभरात 300 कोटींचा गल्ला केला आहे.