‘महिलांना व जेष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात गेली आहे. महिला आणि ज्येष्ठांना एसटी प्रवासात सवलत दिल्याने एसटीला दर दिवशी 3 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. आणि म्हणूनच यापुढे एसटीमध्ये कोणतीच सवलत नाही असं वक्तव्य राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं होत. लाडक्या बहिणींना बस मध्ये 50 टक्के सवलत ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे. अशीच सवलत आपण जर सर्वांना देत बसलो तर महामंडळ चालवणं कठीण होईल असं मला वाटतं .’ पत्रकारांनी एसटी प्रवासात सवलतीची मागणी केली तेव्हा सरनाईक यांनी हे भाष्य केलं होत.
त्यानंतर त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत बंद होणार का? अशा चर्चा रंगू लागू लागल्या.
यावरच आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. शिंदे यांनी सवलत बंद होणार असल्याचे वृत्त फेटाळले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्याचबरोबर एसटी बसच्या प्रवासात लाडक्या बहिणींना देण्यात आलेली 50 टक्के सवलत बंद होणार नाही. तसेच जेष्ठ नागरिकांनाही मिळणारी सवलत बंद केली जाणार नाही.’ एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर आता राज्यातील महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.