माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि माजी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना आजही अटक होऊ शकते. फक्त नरेंद्र मोदी यांची त्यांच्यावर कृपा आहे तोवर ते बाहेर आहेतं. ज्या दिवशी मोदींची इच्छा पलटेल त्या दिवशी आदित्य हे जेलमध्ये असतील. तसेच आदित्य यांच्या काळातील भ्रष्टाचार देखील लवकरच काढून मोकळं केला जाईल. तसेच काही काळापासून राज्यात भ्रष्ट नोकरशाहीने कळस काढला आहे आणि राजकारण्यांनी तर राजधर्म विकून टाकला आहे, ‘, असा दावा देखील किशोर तिवारी यांनी ‘साम टिव्ही’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.
शिवसेना उबाठाचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी यांनी आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत केलेल्या दाव्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
किशोर तिवारी यांची नुकतीच शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पुढे तिवारी असंही म्हणाले की आदित्य ठाकरे मंत्री होते. म्हणजेच कॅबिनेट मंत्री असताना ते दिशा सालियानच्या घरी पार्टी अटेंड करण्यासाठी गेले होते. त्याच्यानंतर सालीयानने आत्महत्या केली. मी नसतो तर यांना त्याच वेळी अटक झाली असती. पण मी मीडियामध्ये जोरकसपणे बाजू मांडून दाखवून दिलं की भाजपचे कटकारस्थान चालू देणार नाही. त्यामुळे त्यावेळी आदित्य ठाकरे हे वाचले, असही त्यांनी पुढे सांगितलं.
दरम्यान, तिवारी हेच सगळ्यात मोठेगुन्हेगार आहेत. तसेच तिवारी यांच्या बोलण्यात कुठलीच संगती नाही. ते जर म्हणत असतील आदित्य ठाकरेंना मी वाचवले तर सगळ्यात मोठे गुन्हेगार तेच आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. मात्र, भाजपनेच हे केलेल कटकारस्थान असल्याचेच तिवारी सांगत आहेत. अशी प्रतिक्रिया तिवारी यांनी केलेल्या दाव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी साम टिव्हीशी बोलताना दिली. त्यामुळे या प्रकरणांत काय खरं? काय खोटं हे लवकरच समोर आलं पाहिजे.