महाराष्ट्रात पहिल्यांदाच फडणवीस सरकारने गेल्या ३० वर्षात बांधलेली ८२७ एकर, ४१११ अतिक्रमणे निर्भयपणे हटवली आहेत. ही जमीन बांगलादेशी आणि रोहिंग्या बेकायदेशीर स्थलांतरितांनी बळकावली होती.
कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाईबाबत आमदार महेश लांडगे यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे. महानगरपालिका प्रशासनाने कुदळवाडी-चिखली भागात भारतातील सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई केली आहे. ही कारवाई ८ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरु होती. या कारवाई दरम्यान एकूण ४ हजार १११ अतिक्रमणांवर कारवाई झाली. यामध्ये एकूण ३ कोटी ६० लाख ५८ हजार ७४६ चौरस फूट क्षेत्रावरील म्हणजे सुमारे ८२७ एकर क्षेत्रावरील अतिक्रमण निष्कासित करण्यात आले. या कारवाईमुळे महापालिकेचे रस्ता आणि आरक्षणांसाठीचे एकूण १०० एकर क्षेत्र अतिक्रमणमुक्त झाले आहे.’
‘खरं तर पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधील कुडलवाडी, चिखली या ठिकाणी बेकायदेशीर भंगार दुकाने, अतिक्रमणे आणि इंद्रायणी नदी प्रदूषणामुळे हा मुद्दा चर्चेत आला होता. याठिकाणी बेकायदेशीर नागरिक राहत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. तसेच या ठिकाणी बेकायदेशीर कामे देखील केली जात होती.’
याठिकाणी बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरित हे केंद्र चालवत होते, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. आणि म्हणूनच याविरुद्ध कारवाई करणे गरजेचे होते.
वाहतूक गोंधळ, गुन्हेगारी, हिंदू मुलींना आमिष दाखवणारे लव्ह जिहादचे प्रकरण, जमीन जिहाद मालमत्ता हडप करणे आणि हिंदू मिरवणुकांवर दगडफेक यासारख्या घटना या भागात घडत आहेत. इंडियन मुजाहिदीन बॉम्बस्फोटांशी संबंधित यासीन भटकळ सारख्या दहशतवाद्यांना याठिकाणी संरक्षण देण्यात आलं होत.
अशास्थितीत जर सरकारने या विरुद्ध वेळीच कारवाई केली नसती तर हे ठिकाण गुन्हेगारांचे केंद्र असलेले दहशतवादी क्लब बनले असते. या ठिकाणी अतिक्रमण अत्यंत महत्वाचे बनले होते. हे काम देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले आहे. फडणवीसांकडून विरोधी पक्ष आणि मित्रपक्षांच्या राजकीय दबावाला न जुमानता ९०० एकर बेकायदेशीर अतिक्रमण पूर्णपणे पाडले आहे.
इंद्रायणी प्रदूषण, वायू व ध्वनी प्रदूषण, अवैध धंदे, वाढती गुन्हेगारी आणि आगीच्या घटना यांना प्रतिबंध करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर कारवाईसाठी महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासनाला पाठबळ दिले. ज्यामुळे या कारवाईला यश आले. असं म्हणत आमदार महेश लांडगे यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे.