दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड करण्यात आलीये. रविवारी झालेल्या आप आमदारांच्या बैठकीत दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यात आला. बैठकीत सर्व आमदारांनी आतिशी यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली.
यासह, आतिशी हे पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. आतिशी यांची निवड झालेल्या पक्षाच्या २२ आमदारांच्या बैठकीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल देखील सहभागी होते.
पहिल्यांदाच सभागृहाचे नेते आणि विरोधी पक्षनेते या दोन्ही महिला असतील. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. माजी मुख्यमंत्री आतिशी यांना विरोधी पक्षनेते बनवण्यासाठी बैठकीत एकमत झाले. कालकाजी मतदारसंघातून आतिशी यांनी भाजप नेते आणि माजी खासदार रमेश बिधुरी यांचा पराभव केला होता.
दिल्ली विधानसभेच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेत्या आणि सभागृहाच्या नेत्या या दोन्ही महिला असतील.
दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजप पुन्हा सत्तेत आला आहे. भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकल्या. यावेळी पक्षाने रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी निवड केली. रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी सुष्मा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी या महिला मुख्यमंत्री होत्या. मात्र, पहिल्यांदाच सभागृहाचे नेते म्हणजेच मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते या दोन्ही महिला असणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत आपचा पराभव
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला. पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत येऊ शकला नाही. या पक्षाला केवळ 22 जागा मिळाल्या. मागील निवडणुकीत या पक्षाने 70 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपला 40 जागा मिळाल्या होत्या. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि सौरभ भारद्वाज यांच्यासारखे प्रमुख नेते या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.