France : फ्रान्समधून एक मोठी बातमी समोर येत आहे. फ्रान्समधील मासिर्ले येथे सोमवारी (24 फेब्रुवारी) एक मोठा स्फोट झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, रशियन दूतावासाजवळ हा स्फोट झाला असून रशियन परराष्ट्र मंत्रालयाने याला दहशतवादी हल्ला म्हणून संबोधित केले आहे.
स्फोटाच्या माहिती मिळताच या ठिकाणी सुमारे तीस अग्निशमन दलाचे जवान पोहलले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु केले. या हल्ल्यात अजून कोणीतीही जीवितहीनी किंवा वित्तहानी झाली असल्याची माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ‘या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या भागात अज्ञात लोकांकडून दोन पेट्रोल बॉम्ब फेकण्यात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसचे पोलिसांनी घटनास्थळावरुन एका गाडीला जप्त केले असून ही चोरीची असल्याचे म्हटले आहे. सध्या संपूर्ण परिसरात बंदोबस्त करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.
दरम्यान, रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी या हल्ल्याला दहशतवादी कृत्य म्हटले असून त्यांनी हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच त्यांनी रशियन दूतावास आणि राजनैतिक ठिकाणांची सुरक्षा वाढवण्याची देखील मागणी केली आहे.
यापूर्वीही फ्रान्समध्ये चाकू हल्ल्याची नोंद झाली होती, ज्यात एक व्यक्ती ठार झाली होती आणि तीन जण जखमी झाले होते. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या हल्ल्याला ‘इस्लामी दहशतवादी हल्ला’ म्हटले होते. जर्मनीच्या सीमेजवळील मुलहाऊस येथे झालेल्या या घटनेत एका पोर्तुगीज नागरिकाचा मृत्यू झाला होता.तर या घटनेत सात पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते.