१४४ वर्षातून एकदाच आयोजित होणाऱ्या महाकुंभात करोडोंनी भाविक सहभागी झाले होते. फक्त देशतीच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक महाकुंभात येऊन पवित्र स्नान करून गेले आहेत. दरम्यान, २०२५ मधील सर्वात मोठा उत्सव, महाकुंभ, आता संपणार आहे. २६ तारखेला महाशिवरात्रीच्या शेवटच्या स्नानानंतर महाकुंभाचा शेवट होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मान्यवर आता महाकुंभात जाताना दिसत आहेत.
त्याचदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील महाकुंभात सामील होण्यासाठी प्रयागराजला पोहोचले असून, एकनाथ शिंदेंनी आज त्रिवेणी संमगावर पवित्र स्नान केलं आहे. त्यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार आणि खासदार देखील महाकुंभात दाखल झाले होते. एकनाथ शिंदेंनी अमृतस्नान केल्यानंतर राज्यातील सफाई कर्मचाऱ्यापासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे.
तसेच राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील स्नान केल आहे. यावेळी त्या त्यांच्या आई प्रज्ञा मुंडे यांच्यासोबत महाकुंभात दाखल झाल्या होत्या.
फक्त राजकीय क्षेत्रातूनच नव्हे तर बॉलिवूड मधून देखील अनेक कलाकार महाकुंभात पोहचले होते. अभिनेता अक्षय कुमार अभिनेत्री कैटरीना कैफ यांनी देखील आज महाकुंभात सहभागी होत त्रिवेणी संगमात स्नान केले आहे.
१३ जानेवारी रोजी सुरु झालेल्या महाकुंभचा शेवट २६ फेब्रुवारी रोजी होणार असून, अनेक भाविक आता प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत.