मंगळवारी सकाळी पश्चिम बंगालमध्ये काही प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बंगालचे उपसागर हे भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगितले जात आहे. भूकंपाची तीव्रता 5.1 रिश्टर स्केल इतका नोंदवला गेला आहे. भूकंपाची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे. हा भूंकप सकाळी 6:10 वाजता नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, कोलकाताजवळील भूकंपाची पुष्टी नॅशनल सेंटर फॉर सिसामोलॉजीने केली आहे. सकाळी झालेल्या भूकंपामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या भूकंपात कोणतीही वित्तीय हानी तसेच जीवित हानी झाल्याची बातमी अद्याप समोर आलेली नाही.
यापूर्वी रविवारी दुपारी 3.24 वाजता उत्तर प्रदेशच्या गझियाबाद येथे 2.8 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिसामोलॉजीच्या म्हणण्यानुसार, रविवारी झालेल्या भूकंपाची खोली 10 किमी होती.
तर काही दिवसांपूर्वी दिल्लीत देखील भूकंप येऊन गेला आहे. दिल्लीत 4.0 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण पश्चिम दिल्लीतील धौला कुआनमध्ये होता. या भूकंपाचे धक्के काही सेकंद जाणवले होते. ज्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूकंपाचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.