बांगलादेशातील कॉक्स बाजार येथील हवाईतळावर स्थानिक राशीवाशांनी हल्ला केला आहे. यावेळी सुरक्षा दलांचे कर्मचारी आणि जमावामध्ये झालेल्या संघर्षात एकाच मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेने मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारसाठी आणखी एक धक्का मानला जात आहे. युनूस यांच्यावर आधिच देशात सुरू असलेली अराजकता रोखण्यासाठी कोणतीही ठोस पावले न उचलल्याचा आरोप आहे. अशातच आता झालेल्या चकमकीत एकचा मृत्यू झाल्याने देशातील राजकारण तापत आहे.
कॉक्स बाजार येथील हवाईतळावर जमावाने हल्ला केला. त्यांनतर सुरक्षा जवानांमध्ये आणि जमावामध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा जवानांकडून गोळीबार देखील करण्यात आला. ज्यात एकाच मृत्यू झाला आहे. दरम्यान, या प्रकरणावर स्थानिक पोलिसांकडून तपास सुरु आहे.
कॉक्स हवाईतळावर झालेल्या या चकमकीत अनेक लोक जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांकडून देण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. हवाई दलाच्या जवानांनी जमावावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. ज्यात एकाच मृत्यू झाला. असं एका स्थानिक पत्रकाराने सांगितले आहे.
गेल्या वर्षापासून हिंसाचार सुरूच…
बांगलादेशात गेल्या वर्षभरापासून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यापासून देशाची सुव्यवस्था आणि कायदा नाजूक स्थितीत आहे.