महापालिका निवडणुकीसंदर्भात आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. निवडणुकीचे काय होणार या दृष्टीने सर्वांच्या नजरा या निकालाकडे लागून आहेत. राज्यात महापालिकेच्या निवडणुका तीन वर्षांपासून झालेल्या नाहीत. अशा स्थितीत आज यावर काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
देशात नुकत्याच लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. यानंतर आता महाराष्ट्रात वेध लागले आहेत ते म्हणजे महागनरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे. या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे आता या निवडणुका लवकरच घेतल्या जाव्यात यासाठी प्रयत्न होत असताना आज सुप्रीम कोर्टात पालिका निवडणुकांबाबत सुनावणी आहे.
आजची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती एन. के. सिंग यांच्या खंडपीठापुढे पार पडणार आहे. दरम्यान, या सुनावणीत निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.