स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. या सुनावणीकडे राज्यातील जनतेचं व राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होत. मात्र, आता पुन्हा महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या रखडलेल्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहे. आता यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी ४ मार्चला होणार आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्ष कामाला देखील लागले आहेत.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आज यावर कोणताही निकाल न देत तारीख पुढे ढकली आहे. ज्यामुळे अनेकजण नाराज दिसत आहेत. आता आठ दिवसांनी म्हणजेच ४ मार्चला सुनावणी होणार की पुन्हा तारीख पुढे पुढे ढकलली जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. देशात लोकसभेपाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणूक झाली. त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील, याकडे सर्वांचे लक्ष होते. आज यावर सुनावणीची अपेक्षा होती. मात्र, आजही इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.