महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्ता वरती राज्यातील भगवान शंकराच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते. महाशिवरात्रीनिमित्त नाशिक मधील मंदिरे विद्युत रोषणाई मुळे झळाली होती
शहरातील ऐतिहासिक असलेल्या कपालेश्वर सोमेश्वर टाळकोटेश्वर नारोशंकर नीलकंठेश्वर सिद्धेश्वर या सह जिल्ह्यामध्ये असलेल्या लहान मोठ्या मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा लावलेल्या होत्या महाशिवरात्रीनिमित्त दूध दही तूप साखर मग या पंचामृताने महादेवाला अभिषेक करण्यात आला तसेच धोत्र्या बेलाची फळे आणि फुले वाहून पूजा करण्यात आली. तर कपालेश्वर मंदिरामध्ये खास नेपाळ वरून आणलेल्या रुद्राक्षाचा प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. पॉल्युशन मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावरती भाविकांनी गर्दी केलेली होती या मंदिराला पौराणिक मोठे महत्त्व असल्यामुळे या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त देशाच्या विविध भागातून नागरिक येत असतात त्या ठिकाणी सर्वसाधारण वीस मिनिटांमध्ये नागरिकांचे दर्शन होईल अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले होते.शहरामध्ये असलेल्या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त नाम जपाचे आयोजन करण्यात आले होते तसेच भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते विविध ठिकाणी महाप्रसाद देखील वाटप करण्यात येत होता.
गोदाकाठी मोठी गर्दी
महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावरती दक्षिणेची काशी असलेल्या गंगा गोदावरी संगमावरती सकाळच्या वेळी स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केलेली होती त्यामुळे या ठिकाणी मिनी कुंभमेळ्याचे स्वरूप आलेले होते. प्रारंभिक स्तरावर ती मिळालेल्या माहितीनुसार महाशिवरात्रीच्या पावन पर्वावरती सुमारे एक लाख नागरिकांनी गंगेमध्ये स्नान केल्याच प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे तर या परवा निमित्ताने या ठिकाणी नागरिकांनी मोठे धार्मिक विधी देखील केले.
प्रयागराज कुंभमेळा अमृतस्नान पर्वकाळ आटोपल्याने महाशिवरात्रीला येथे साधू महतांनी ब्रह्ममूर्तावरपर्वस्नान गोदावरी कुशावर्त तीर्थात पर्वस्नान केले.पंचायती निरंजनी आखाडा येथून सवाद्य मिरवणुकीने निघालेले साधूनी स्नान मेनरोड मार्गे ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतले.
नागपूर येथील नागेश्वराच्या महादेव मंदिरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी करण्यात आली शहरातील सर्वच मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या बम बम भोलेच्या जयघोषात महाशिवरात्री साजरी करण्यात आली असल्याचे दिसून आले.