ममता बॅनर्जी यांचे सरकार असलेल्या पश्चिम बंगाल मधला कारभार कसा तुष्टीकरणाच्या धोरणानुसार चालतो आहे याचे पुन्हा एकदा ढळढळीत उदाहरण समोर आले आहे. कोलकाता महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने २५ फेब्रुवारी रोजी विश्वकर्मा पूजेची सुट्टी रद्द करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. आणि त्या बदल्यात, ईदला अतिरिक्त रजा देण्यात आली. हा आदेश महामंडळाच्या सर्व हिंदी माध्यमांच्या शाळांसाठी देण्यात आला होता.
मात्र भाजपने याचा तीव्र निषेध व्यक्त केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने हा आदेश रद्द केला आणि ही अनावधानाने झालेली टायपिंग चूक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्तांनी एका मीडिया नोटमध्ये म्हटले आहे की, हे आदेश सक्षम अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय जारी करण्यात आले आहेत आणि महानगरपालिका ही बाब गांभीर्याने घेत आहे. या चुकीसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबद्दल त्यांनी बोलले आणि कोलकाता महानगरपालिकेने असेही म्हटले आहे की आता सुट्ट्यांची नवीन यादी जारी केली जाईल.
महामंडळाच्या लेटरहेडवर जारी केलेल्या आदेशावर शिक्षण विभागाच्या मुख्य व्यवस्थापकाची स्वाक्षरी असते. ईद उल फित्रच्या दिवशी सुट्टी वाढवण्यात आल्याने १७ सप्टेंबर २०२५ रोजी विश्वकर्मा पूजेला सुट्टी राहणार नाही, असे आदेशात लिहिले आहे. ३१ मार्च रोजी ईद उल फित्रला सुट्टी आहे, परंतु महानगरपालिकेने विश्वकर्माची सुट्टी रद्द केली आहे आणि १ एप्रिल रोजी ईदला अतिरिक्त सुट्टी दिली आहे.असा मसुदा असलेले पत्रकही समोर आले आहे.
Welcome to Islamic Republic of West Bengal:
They cancelled Vishwakarma Puja holiday and gave it to extended holiday for Eid. pic.twitter.com/GQDcw46ohn
— Facts (@BefittingFacts) February 26, 2025
त्यानंतर विरोधी पक्ष भाजपने हा मुद्दा जोरात उपस्थित केला. भाजपने आरोप केला की, सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आगामी निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्यासाठी तुष्टीकरणाचा खेळ खेळत आहे. कोलकाता महानगरपालिकेचे सध्याचे महापौर फिरहाद हकीम आहेत जे टीएमसी नेते आहेत.
पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख जगन्नाथ चॅटर्जी म्हणाले की, बंगालमधील कोणताही अधिकारी वैयक्तिकरित्या असा आदेश जारी करू शकत नाही. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यावर असा आदेश जारी करण्यासाठी कोणी दबाव आणला हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे,
याआधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाकुंभाला मत्युकुंभ म्हटले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. विधानसभेत उभ्या असताना त्यांनी असे भाष्य केले होते. ममतांनी महाकुंभातील व्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केले होते आणि त्याला मत्युकुंभ संबोधले होते.