पुण्यातील स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता. मात्र आज अखेर शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.शिरूर तालुक्यातील कनाट गावातील उसाच्या चारीत तो लपला होता.स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाने त्याला शिताफीने पकडले. आरोपीला अटक करण्यात गुणाट गावामधील गावकऱ्यांनी पोलिसांची मोठी मदत केली. अगदी गुरुवारी सकाळपासूनच गावकरी पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करीत होते. त्याबद्दल पोलिसांनी गावकऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
दत्तात्रय गाडे उसाच्या शेतात लपल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याला अटक केली.ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरु होतं तिथं तो नव्हताच, तिथं तो सापडलाच नाही. दत्ता गाडे रात्री नोतेवाईक महेश बहिरटी यांच्या घरी साडे दहा वाजता आला. त्यानंतर तो आल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. दत्तात्रय गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली. आणि माझी मोठी चुक झाली आहे. मला सरेंडर करायचं असं सांगून तिथुन निघुन गेला. त्यानंतर पोलीसांनी या घराच्या परीसरात दत्ता गाडेचा शोध सुरु केला.
डॉग स्कॉड ही त्या ठिकाणी आणले गेले. पोलीसांना त्याचा बदलेला शर्ट सापडला , त्याचा वास डॉग स्कॉडला दिला. त्याआधारे डॉग स्कॉडने पुढील रस्ता पोलीसांना दाखवला , पण गाडे ज्या ठिकाणावरून आला होता तिथे परतलाच नाही. तर तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनलमध्ये झोपून राहीला. याच ठिकाणी तो ग्रामस्थांना आढळला.दत्तात्रय गाडेला बाहेर येण्यासाठी आवाहन करण्यात आले होते, त्यानंतर तो सापडल्याचे गुणाट गावच्या पोलीस पाटलांनी सांगितले.ग्रामस्थांनी तो दत्ता गाडेच असल्याचं स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. सध्या आरोपी दत्तात्रय गाडे स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात आहे. यानंतर तपासाची पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.
ग्रामस्थाच्या दाव्यानुसार दत्ता गाडे आत्महत्या करणार होता, पण पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपीची ससून रुग्णालयात पहाटेच वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याला आज शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे.