उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून सुरु असलेल्या महाकुंभात आत्तापर्यंत कोटीच्या संख्येने भाविकांनी पवित्र त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं आहे. महाकुंभ सोहळा 26 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला आहे. या महाकुंभात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. महाकुंभाचे हे यश पाहून अनेकजण याचे कौतुक करत आहेत तर दुसरीकडे काहीजण टीका करण्यात व्यस्त आहेत.
मैं स्वयं कुंभ गया हूँ और, मेरी रोज़ाना की प्रेक्टिस में हर दुसरा मरीज जो आ रहा है वह, अमृत स्नान करके आया है लेकिन, अभी तक मुझे ऐसा कोई भी मरीज़ नहीं मिला जिसे त्वचा की बीमारी हो।
सत्य उल्टा है, कि कुंभ की सफलता को देख थानवी जी जैसे वामियों की मानसिक बीमारियां जरुर बढ़ गई हैं। pic.twitter.com/OBtpSjLir2— Dr. Jitendra Nagar (@NagarJitendra) February 28, 2025
नुकतंच ज्येष्ठ पत्रकार आणि हिंदी लेखक ओम थानवी यांनी महाकुंभावर टीका करत महाकुंभात स्नान केल्यामुळे भाविकांना त्वचेचे रोग उद्भवत असल्याचे म्हंटले आहे. त्यांच्या याच ट्विटला उत्तर देत डॉक्टर जितेंद्र नगर यांनी म्हंटल आहे की, ‘मी स्वतः कुंभमेळ्याला गेलो आहे आणि माझ्याकडे नियमित येणारे रुग्ण देखील या पवित्र संगमात स्नान करून आले आहेत. परंतु आतापर्यंत माझ्याकडे येणाऱ्या एकाही रुग्णाला त्वचेचा आजार झालेले नाही. पुढे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले की, सत्य याच्या उलट आहे की, कुंभमेळ्याचे यश पाहिल्यानंतर थानवीजीसारख्या डाव्या विचारवंतांचे मानसिक आजार नक्कीच वाढले आहेत.
दरम्यान, महाकुंभाचे सर्वात मोठे आकर्षक म्हणजे कु़भमेळ्यात मोठ्या संख्येने साधू संत सहभागी होतात. तसेच या महाकुंभात सहभागी होऊन साधू संत आणि भाविक एकता दाखवण्याचा, समानतेच्या मूल्यांचे पालन करण्याचा आणि विविध समुदायांमध्ये सद्भावना वाढवण्याचा संदेश देतात. याच पवित्र महाकुंभावर आता अनेकजण टीका करताना दिसत आहेत.