आज व्हाईट हाऊसमध्ये एक खूप महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत बरंच काही शिकायला मिळाले. प्रचंड दबावाखाली आणि तणावपूर्ण वातावरणात आणि संभाषणाशिवाय पार पडलेल्या बैठकीतून काहीच निष्पन्न होत नाही. पण उत्कट भावनेतून आणि अंदाजातून जे आम्हाला वाटलं आहे ते आश्चर्यकारक आहे. आणि आता मी ठरवलय की युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना शांतता करारात अमेरिकेचा सहभाग पाहिजे आहे. पण लगेच शांतता नकोय. कारण त्यांना वाटतय की रशिया – युक्रेन प्रकरणात आमच्या सहभागामुळे त्यांना वाटाघाटींमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. पण मला कुणाचाही फायदा नको आहे. मला शांतता हवी आहे. झेलेंस्की यांनी संयुक्त राज्य अमेरिकेचा अनादर केला आहे. त्यामुळे आत ते जेव्हा शांतता करारासाठी तयार असतील तेव्हाच ते परत येऊ शकतात.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 28, 2025
अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत झालेल्या तणावपूर्ण बैठकीनंतर दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याकडून शांतात कराबाबत अपेक्षा होत्या. मात्र, झेलेन्स्की यांनी यावर आक्रमक पवित्रा घेत उलट ट्रम्प यांनाच सुनावले. यानंतर मात्र, जगभरात हा चर्चेचा विषय ठरला.
शक्रवारी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी व्हाईट हाऊसला भेट दिली. तिथे स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष झेलेन्स्की यांचे स्वागत केले. पुढे दोन्ही नेते व्हाईट हाऊसच्या ओव्हल हाऊसमध्ये चर्चेसाठी पोहोचले.
या बैठकीत पत्रकार देखील उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्दयांवर चर्चा सुरु होती. या चर्चेत ट्रम्प यांनी रशियाशी करारात युक्रेनला नमते घ्यावे लागेल असा इशारा दिला. मात्र, युक्रेनकडून हा इशारा धुडकावून लावण्यात आला आणि तिथेच दोन्ही देशात वादाची ठिणगी पडली. आणि दोन्ही नेत्यांमध्ये कॅमेरासमोर वाकयुद्ध रंगले. जे सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल झाले.
खरं तर ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या या भेटीदरम्यान रशिया-युक्रेन युद्धाला पूर्णविराम मिळेल. आणि यात अमेरिकेचा पाठिंबा वाढेल अशी आशा जगभरातून व्यक्त करण्यात आली होती. मात्र, दोन्ही नेत्यांमधल्या या वादाने जगाला धक्का बसला.