अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंध सुधारू शकतात. परंतु शांतता करारावर होणारी चर्चा ही बंद खोलीत ठेवण्याची गरज आहे. जर अमेरिकेने युक्रेनच्या सुरक्षेची हमी दिली व युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले तर मी राजीनामा देण्यास तयार आहेत.
रशियाबरोबरच्या शांतता करारात युक्रेन आपला प्रदेश अजिबात सोडणार नाही. अमेरिकेबरोबर खनिज करार होताना दिसत होता पण शुक्रवारी ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीत वाद झाल्याने या करारावर चर्चा मधेच थांबली.
युक्रेनला अमेरिकेकडून सुरक्षा हमीची अपेक्षा आहे. जी रशियाला भविष्यात हल्ले करण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक आहे.
ट्रम्प यांनी युक्रेनला अमेरिकी मदत देण्याच्या बदल्यात खनिज कराराची मागणी केली होती. कारण युक्रेनमध्ये लिथियम आणि दुर्मिळ खनिजांचे साठे आहेत जे अमेरिकेसाठी महत्त्वाचे आहेत.
आम्हाला भविष्यासाठी एक मजबूत युद्धविराम हवा आहे. युक्रेनचा एकही इंच प्रदेश रशियाला देणार नाही. आम्हाला आशा आहे की अमेरिका रशियाकडून होणारा कोणताही हल्ला पूर्णपणे थांबवेल.’
अशी प्रतिक्रिया युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्यासोबत शुक्रवारी अमेरिकेत झालेल्या तणावपूर्ण बैठकीनंतर रविवारी दिली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याकडून शांतात कराबाबत अपेक्षा होत्या. मात्र, झेलेन्स्की यांनी याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत उलट ट्रम्प यांनाच सुनावले. यानंतर मात्र, जगभरात हा चर्चेचा विषय ठरला.
शक्रवारी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी व्हाईट हाऊसला भेट दिली. त्यानंतर दोन्ही नेते व्हाईट हाऊसच्या ओव्हल हाऊसमध्ये चर्चेसाठी पोहोचले होते.
या बैठकीत पत्रकार देखील उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्दयांवर चर्चा सुरु होती. या चर्चेत ट्रम्प यांनी रशियाशी करारात युक्रेनला नमते घ्यावे लागेल असा इशारा दिला. मात्र, युक्रेनकडून हा इशारा धुडकावून लावण्यात आला आणि तिथेच दोन्ही देशात वादाची ठिणगी पडली आणि वाद रंगला. त्यानंतर झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊस सोडावे लागले होते.