केंद्रीय मंत्री युवक कल्याण मंत्री आणि रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी संत मुक्ताबाईंच्या जत्रेत छेड काढली होती. यानंतर ७ जणांवर पॉस्को आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले.
त्यानंतर मुलीच्या छेड काढल्याप्रकरणी ४ संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. अजूनही ३ आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. त्यासाठी पोलिसांच्या ३ तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत. या घटनेतील मुख्य संशयित अनिकेत भोई याला गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अटक केली होती. तर अन्य ३ संशयितांना रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली आहे.
त्या फरार संशयीतांच्या शोधासाठी पोलिसांचे तीन पथक हे मध्य प्रदेशासह विदर्भ आणि मराठावाड्यात रवाना झाले होते. या पथकाच्या माध्यमातून फरार संशयितांचा कसून शोध सुरू आहे.
रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरमी अनिकेत भोई , पियुष मोरे – महाजन, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी चेतन भोई , सचिन पालवे या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीमध्ये पियुष मोरे, अनिकेत भोई,सोम माळी, अतुल पाटील, किरण माळी यांचा समावेश आहे.