जर्मनीमध्ये गर्दीमध्ये दहशदवादी हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. जर्मनीमधील मॅनहाइम शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मॅनहाइम शहरातील एका चौकात गर्दी असलेल्या ठिकाणए एक भरधाव कार आली आणि या गर्दीत घुसली. या कारने अनेकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दोनजण ठार झाले आहेत. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
यासंबंधित स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अशातच पोलिसांनी रहिवाशांना घरातच राहण्याचे आणि या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिलेली नाही.
मॅनहाइम शहराच्या मध्यवर्ती भागात ही घटना दुपारच्या सुमारास घडली, अशी माहिती पोलिसांची दिली आहे. या भागात सध्या मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच या घटनेबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
जर्मनीला या वर्षीच्या सुरुवातीपासून अनेक दहशदवादी धमक्या सोशल मीडियावर आल्या आहेत. त्यामुळे पोलिस आधीपासूनच हाय अलर्टवर होते.
Another attack in Germany.
A car plows into a crowd near Wasserturm, killing 1 and injuring multiple people. Suspect in custody. #Mannheim #Germany pic.twitter.com/mtOC4h2chx
— Manish Shukla (@manishmedia) March 3, 2025
दरम्यान, या घटनेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारच्या घटनेला पोलिसांनी दहशतवादी हल्ला म्हणून अजून तरी संबोधलेले नसले तरी, अलिकडच्या काही महिन्यांत हिंसाचाराच्या अनेक घटनांमध्ये गाड्यांचा वापर घातक शस्त्रे म्हणून करण्यात आला आहे. त्यामुळे हा हल्ला देखील दाहदवाद्यांनी घडवून आणलेला हल्ला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.