मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेते निळू फुले अर्थात निळकंठ कृष्णाची यांनी मराठी चित्रपटांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांची कन्या गार्गी फुले-थत्ते देखील गेल्या बऱ्याच काळापासून पाड्यावर काम करताना दिसल्या आहेत. मात्र, आता त्यांनी असा एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
गार्गी फुले यांनी अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. त्यांनी देखील कलाविश्वात आपली एक जागा निर्माण करत प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली आहे. मात्र, आता त्यांनी अचानक मराठी मालिकाविश्वातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर करत प्रेक्षकांना धक्का दिला आहे. त्यांनी अचानक मालिकांमध्ये काम न करण्याच्या निर्णयाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाने त्यांच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. त्यांनी हा निर्णय का घेतला ? असा सवाल देखील त्यांना विचारला जात आहे.
यावर त्यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. आणि आपण हा निर्णय का घेतला यावर स्पष्टीकरण दिल आहे. गार्गी म्हणाल्या की, “खरं सांगायचं तर मी, मालिकाविश्वातून स्वेच्छेनं निवृत्ती घेतली आहे. कारण मी मालिकाविश्वात 10 वर्ष काम केलं आहे. माझं कुटुंब पुण्यात आहे. मी 10 वर्षे कुटुंबापासून खूप लांब राहिलेय. खरं सांगायचं तर, कलाकारांसाठी मालिकेचं शेड्युल खूप विचित्र झालं आहे. मालिकेमध्ये काम करण्याची जर तुमच्यात आवड असेल तरच तुम्ही मराठी मालिकाविश्वात काम करावं. बाकीच्या दृष्टीने आरोग्यच्या असो किंवा इतर, तर खूप त्रास होतो.” असं त्या म्हणाल्या आहेत.