आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि भारत आमने-समाने आहेत. या सामन्याची सुरुवात झाली तेव्हा भारतीय संघ मैदानात हातात काळी पट्टी बांधून उतरला. भारतीय संघ मैदानात आल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला की, भारतीय संघ हातात काळी फीत बांधून मैदानात का उतरला आहे.
तर, भारतीय खेळाडू मुंबईचा महान फिरकीपटू पद्माकर शिवालकरला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हातात काळी फीत बांधून मैदानात उतरले. पद्माकर शिवालकर यांचे एक दिवस आधी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. 1961-62 ते 1987-88 दरम्यान 124 प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या शिवालकरने 19.69 च्या सरासरीने 589 विकेट घेतले आहेत. भारतीय क्रिकेट मंडळाने 2017 मध्ये त्याला सी.के नायडू ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले होते.
पद्माकर शिवालकर याच्या क्रिकेट कारकिर्दीत शिवालकर याने वयाच्या 22 व्या वर्षी रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले आणि वयाच्या 48 व्या वर्षापर्यंत तो खेळत राहिला. त्याची प्रथम श्रेणी कारकीर्द 1961-62 ते 1987-88 पर्यंत होती. त्याने एकूण 124 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. आणि 19.60 च्या सरासरीने 589 विकेट घेतल्या आहेत. ज्यापैकी 361 विकेट या रणजी ट्रॉफीमध्ये घेतल्या आहेत.
खेळाडू हातात काळी पट्टी का बांधतात?
कोणत्याही देशातील महत्वाच्या व्यक्तीचे निधन झाले असेल आणि त्यानंतर जर त्या कालावधीत सामना होणार असेल तर त्या देशाचे खेळाडू हातात काळी पट्टी बांधून मैदानात उतरता. श्रद्धांजली वाहण्यासाठी हातात काळी पट्टी बांधून मैदानात उतरण्याची परंपरा आहे.