राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडल्याची मोठी माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच महायुती सरकराकडून काही मंत्र्यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, हसन मुश्रीफ यांनी आता आपल्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडल्याची माहिती समोर येत आहे. हसन मुश्रीफ यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
अशातच समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांना त्यांच्या मतदारसंघात जास्त वेळ देता येत नव्हता म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याच बोललं जात आहे.
मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे आहेत. आणि त्यांना पालकमंत्रीपद वाशिम जिल्हाचं देण्यात आलं. कोल्हापूर ते वाशिममध्ये जास्त अंतर आहे. हा प्रवास जवळ-जवळ ६०० किलोमीटरचा आहे. या प्रवासात जवळपास दोन दिवस जात होते. त्यामुळे कोल्हापूर या त्यांच्या मतदारसंघात त्यांना लक्ष देता येत नव्हतं. या कारणास्तव त्यांनी वाशिमचं पालकमंत्री पद सोडलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
दरम्यान, वाशीमचं पालकमंत्री पद सोडण्याबाबत हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत देखील चर्चा केली असल्याचं समजत आहे. अशातच आता वाशीमचं पालमंत्रीपद कोणाकडे येणार याची चर्चा सुरु झाली आहे.
हसन मुश्रीफ यांच्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.