जगभरात सध्या व्यापार युद्ध सुरु आहे. अनेक देश एकमेकांवर मोठ्या प्रमाणात कर लादत आहेत. यासर्वात अमेरिकेने देखील असाच एक निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांन भारतासह इतर देशांवर कर लादण्याबाबत एक मोठी घोषणा केली आहे.
ट्रम्प यांनी यासाठी तारीख देखील निश्चित केली आहे. 2 एप्रिल 2025 भारतासह इतर देशांना परस्पर कर लागू केला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
मंगळवारी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना ट्रम्प यांनी यावर भाष्य केलं आहे. यावेळी भाषणात सुरुवातीला ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिका परत आली आहे. पुढे त्यांनी चीन, भारत व इतर अनेक देशांना परस्पर शुल्क लादण्याचा इशारा दिला. यावर त्यांनी सांगितले की, हे पाऊल अमेरिकेला पुन्हा समृद्ध करेल. इतर देश अमेरिकेपेक्षा खूपच जास्त शुल्क आकारत असून हे खूप अन्यायकारक आहे. असं ते आपल्या भाषण म्हणाले.
आपल्या भाषणात ते म्हणाले की, ‘भारत अमेरिकेच्या उत्पादनांवर 100 टक्के कर लावतो. हे अजिबात चांगले नाही. पुढे ट्रम्प म्हणाले की, ‘2 एप्रिलपासून अमेरिकेवर शुल्क लादणाऱ्या देशांवर अमेरिका समान शुल्क लादेल.’
ट्रम्प म्हणाले की, ‘इतर देशांनी आमच्याविरुद्ध अनेक दशकांपासून करांचा वापर केला आहे आणि आता आमची वेळ आहे. जर या देशांनी आम्हाला त्यांच्या बाजारापासून दूर ठेवण्यासाठी गैर-आर्थिक कर लादले तर त्यांना आमच्या बाजारापासून दूर ठेवण्यासाठी आम्हीही असेच करू.’ असे ट्रम्प म्हणाले आहेत.
हा परस्पर कर काय आहे?
एका देशाने दुसऱ्या देशातून आयात केलेल्या वस्तूंवर लादलेला कर म्हणजे परस्पर कर होय. म्हणजेच, इतर देश अमेरिकन वस्तूंवर जितके जास्त कर लादेल, तितकेच अमेरिका त्या देशाच्या वस्तूंवर कर लादेल.
परस्पर कर म्हणजे जेव्हा एक देश दुसऱ्या देशातून आयात केलेल्या वस्तूंवर कर (आयात कर) लादतो, तर दुसरा देश देखील त्याच प्रमाणात त्या देशाच्या उत्पादनांवर कर लादतो. सोप्या शब्दात, याला ‘जसे आहे तसे’ धोरण म्हटले जाऊ शकते.
उदाहरणार्थ, जर एखाद्या देशाने अमेरिकन उत्पादनांवर 10 टक्के आयात कर लादले तर अमेरिका त्या देशातून येणाऱ्या वस्तूंवरही 10 टक्के कर लादेल.