विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. राज्य सरकारच्या सर्वात चर्चेत आलेल्या योजनेचा आतापर्यंत अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकराने सुरु केलेल्या या योजनेअंतर्गत महिलांना सरकारकडून 1500 रुपये दिले जात आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत जर महायुतीचे सरकार जिंकून आले तर लाडक्या बहिणांना 2100 रुपये दिले जातील अशी घोषणा जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली होती. यावरच विधानपरिषदेत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना विचारणा झाली असता त्यांनी याचं उत्तर दिल आहे.
यावर बोलताना आदिती तटकरे म्हणल्या आहेत की, ‘जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो त्यामुळे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री जेव्हा प्रस्तावित करतील तेव्हापासून लाडक्या बहिणींना विभागाकडून हा लाभ देण्यात येईल. यंदाच्या अर्थसंकल्पात 2100 रुपये देणार असल्याची घोषणा आम्ही केलेली नाही. असं वक्तव्य आदिती तटकरे यांनी केलं आहे. त्यामुळे आता यावर्षी तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. यावर देखील त्यांनी भाष्य करत महिलांना कधी हप्ता दिला जाईल याबद्दल देखील सांगितलं आहे. महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित देण्यात येणार असून, ही रक्कम ७ मार्चला महिलांच्या खात्यात जमा होईल असं सांगण्यात आलं आहे.