परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. ब्रिटन आणि आयर्लंडच्या सहा दिवसांच्या दौऱ्यादरम्यान, काल जयशंकर लंडनच्या चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित होते. याचदरम्यान त्यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. ज्यानंतर भारतीयांकडून या घटनेचा निषेध केला जात आहे.
जयशकंर लंडनमध्ये कार्यक्रमासाठी पोहचताच खलिस्तानी दंगलखोरांनी पुन्हा एकदा सर्व मर्यादा ओलांडल्या आणि जयशंकर यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जयशंकर जेव्हा चॅथम हाऊसबाहेर पोहचले तेव्हा खलिस्तानी दंगलखोरांनी गोंधळ घालायला सुरुवात केली तसेच खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा देखील दिल्या. तसेच निदर्शने देखील केली.
त्यानंतर खलिस्तानी समर्थकांनी जयशंकर यांच्या वाहना भोवती घेराव घातला. त्यापैकी एकाने त्यांच्या गाडीसमोर येऊन तिरंगा ध्वज फाडला व तिरंग्याचा अपमान केला.
हा सगळा प्रकार जयशकंर कार्यक्रम आटपून बाहेर पडल्यानंतर घडला. यावेळी खलिस्तान समर्थक जयशंकर यांच्या गाडीचा पाठलाग करत त्यांच्या गाडीच्या दिशेने गेले. आणि घोषणाबाजी सुरू केली. यानंतर त्यांच्या ताफ्यावर हल्ल्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्षात येताच त्यांनी खलिस्तानी समर्थकांना पकडून गाडीपासून दूर नेले. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने भारतातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. तसेच भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील ब्रिटिश सरकारकडे नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
https://twitter.com/ANI/status/1897445973418500455
दरम्यान, खलिस्तान समर्थकांकडून यापूर्वीही भारतविरोधी कारवाया करण्यात आल्या आहेत. ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये भारतीय दूतावासाबाहेर अशा घटना सात्यत्याने घडत आल्याचे गेल्या काही काळापासून दिसून आले आहे. यावर भारत सरकराने अनेकवेळा भाष्य देखील केलं आहे.