देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी उत्तराखंड मुखवा येथील माँ गंगेची पूजा केली. त्यानंतर त्यांनी एका ट्रेक आणि बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला आणि हर्सिल येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले.
उत्तराखंड सरकारने यावर्षी हिवाळी पर्यटन कार्यक्रम सुरू केला आहे. हजारो भाविकांनी गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या हिवाळी स्थळांना आधीच भेट दिली आहे. धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक अर्थव्यवस्था, होमस्टे, पर्यटन व्यवसाय इत्यादींना चालना देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी उत्तराखंडच्या दौऱ्यावर आले आहेत.
https://twitter.com/narendramodi/status/1897523678448910652
पंतप्रधान मोदींनी यावेळी धार्मिक ठिकांबद्दल भाष्य केलं. ते म्हणाले, ‘काही वर्षांपूर्वी जेव्हा मी बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा मी म्हटले होते की हे दशक उत्तराखंडचे दशक असेल. ते शब्द माझे होते, भावना माझ्या होत्या, पण त्यामागील शक्ती स्वतः बाबा केदारनाथ यांनी दिली होती.’ बाबा केदारांच्या आशीर्वादाने, ते शब्द, त्या भावना सत्यात आणि वास्तवात रूपांतरित होत आहेत. हे दशक उत्तराखंडचे दशक बनत आहे. ऋतू कोणताही असो, पर्यटन चालू राहावे अशी माझी इच्छा आहे. असं पंतप्रधान म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले की, ‘हिवाळ्यात याठिकाणी हॉटेल्स रिकामे राहतात, ज्यामुळे आर्थिक असमतोल निर्माण होतो. जर भारतातील आणि परदेशातील लोक येथे आले तर त्यांना या ठिकाणाच्या आध्यात्मिक आभासाची खरी झलक दिसेल.’
दरम्यान, यावेळी मोदींनी केदारनाथ रोपवेवर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले, ‘केंद्र सरकारने उत्तराखंडसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. केदारनाथ रोपवेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या रोपवे प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातील.’
यापूर्वी पंतप्रधान मोदी 28 जानेवारीला उत्तराखंड दौऱ्यावर आले होते. 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटनसाठी ते याठकाणी उपस्थित होते. ऑक्टोबर 2017 मध्ये पंतप्रधान बनल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच उत्तराखंडला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पहिल्यांदा केदारनाथला भेट दिली. तेव्हापासून त्यांनी नऊ वेळा उत्तराखंडला भेट दिली आहे. मात्र, या दौऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी निवडणूक प्रचारसभांना संबोधित करण्यासाठी अनेक वेळा उत्तराखंडला भेट दिली आहे.