सध्या महाराष्ट्रातील गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकतीच पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेली अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता, आणखी एक धक्कदायक घटना मुंबईतून समोर येत आहे. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात एका 12 वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. या घटनेने आता परिसरात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील स्वारगेट बस्थानकावर एका 26 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर मुंबईतील 12 वर्षीय मुलीवर पाच नराधमांनी लैगिंक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे मुंबईत हादरली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच आरोपीना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या काकांसोबत राहते. 24 फेब्रुवारी रोजी शाळा सुटल्यानंतर ती बेपत्ता झाली होती. त्यानंतर मुलीचे काका पोलीस स्टेशनमध्ये पोहचले आणि मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
यादरम्यान, पीडित मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना रेल्वे पोलिसांना संशय आला. आणि पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. यानंतर दादर रेल्वे पोलिसांनी तात्काळ जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क साधला व पीडित मुलीच्या जवाबानंतर आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि पोस्को कायदा अंतर्गत 5 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. व पाचही आरोपींना अटक केली.
नेमकं काय घडलं?
पीडित मुलगी ही जोगेश्वरीत नातेवाईकाबरोबर राहत असलायचा फायदा घेत नराधम मुलीला त्यांच्या संजय नगर जोगेश्वरी येथील घरी घेऊन गेले आणि त्यानंतर या नराधमांनी मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर 27 फेब्रुवारीला पीडित मुलगी रेल्वे पोलिसांना दादर स्थानकात सापडली. रेल्वे पोलिसांनी तिला जोगेश्वरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या चौकशीत तिच्यावर जोगेश्वरी परिसरात लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी आता पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.