राज्यात मटण विक्री करणाऱ्या दुकानांसाठी मोठी बातमी आहे. मटण विक्री करणाऱ्या दुकानांसाठी खास प्रमाणपत्र देण्याची घोषणा भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. मटण विक्री दुकानदारांसाठी मल्हार प्रमाणपत्र देण्यात येणार असून हिंदू समाजासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
नुकतेच नितीश राणे यांनी मल्हार प्रमाणपत्राचे उद्घाटन केले आहे. पण हे मल्हार प्रमाणपत्र काय आहे? जाणून घेऊया
सोमवारी नितेश राणे यांनी हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला मल्हार प्रमाणपत्र असे नाव देण्यात आले आहे. यासाठी मल्हार प्रमाणपत्र डॉट कॉम वेबसाईट देखील सुरु करण्यात आली आहे.
राज्यात मटण विक्री करणाऱ्या हिंदू व्यावसायिकांसाठी ‘मल्हार प्रमाणपत्र’ देण्यात येणार आहे. या वेबसाइटवर फक्त व्हेरिफाइड विक्रेत्यांची नोंदणी होणार असून, ग्राहकांना शुद्ध व ताजे मटण मिळेल, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
हे पाऊल महाराष्ट्रातील हिंदू समाजासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे राणे यांनी सांगितले. याबरोबरच हिंदूंना केवळ ‘मल्हार प्रमाणित’ दुकानांमधूनच मांस खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.
मल्हार प्रमाणन हे सुनिश्चित करेल की हिंदू खाटिक समुदायाद्वारे मटण पारंपारिक पद्धतीने विकले जाईल.
दरम्यान, मल्हार प्रमाणपत्राची तुलना हलाल प्रमाणपत्राशी केली जात आहे. हलाल प्रमाणपत्र हे प्रमाणित करते की, मांस हे इस्लामिक परंपरेनुसार विकले जात आहे.