होळीच्या सणानिमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
देशवासियांना होळीनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, ‘रंगाचा सण असलेल्या या होळी सणाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा. हा सण एकात्मता आणि प्रेमाचा संदेश देतो. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा हा सण प्रतीक आहे. या पावन पर्वनिमित्त आपण भारत मातेची सर्व मुलं एकत्र येऊन समृद्ध आणि प्रगतिशील जीवनासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.
रंगों के त्योहार होली के पावन अवसर पर सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं। हर्षोल्लास का यह पर्व एकता, प्रेम और सद्भाव का संदेश देता है। यह त्योहार भारत की अनमोल सांस्कृतिक विरासत का भी प्रतीक है। आइए, इस शुभ अवसर पर हम सब मिलकर भारत माता की सभी संतानों के जीवन में निरंतर…
— President of India (@rashtrapatibhvn) March 14, 2025
होळी हा उत्साहाने भरलेला सण असून आनंद देणाऱ्या या उत्सवातील उत्साह एकतेचे रंग दृढ करेल अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होलिकोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) दिलेल्या शुभेच्छा संदेशात पंतप्रधान म्हणाले की, ‘सर्वांना होळीच्या शुभेच्छा. उत्साहाने भरलेला हा सण आनंदाचा उत्सव उत्साह वाढवेल, एकतेचे रंग अधिक दृढ करेल.’ असे मोदींनी आपल्या शुभेच्छा संदेशात नमूद केले आहे.
यासोबतच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये राजनाथ सिंह म्हणाले की, ‘होळीच्या पावन पर्वाच्या सर्वांना खूप शुभेच्छा. आनंद आणि उत्साहाचे प्रतीक असलेला हा सण तुमच्या जीवनात आनंदाचे आणि आरोग्याचे रंग घेऊन येवो. आनंदी आणि सुरक्षित होळीसाठी शुभेच्छा असे राजनाथ यांनी नमूद केले आहे.