जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. काल झालेल्या या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला असल्याची देखील माहिती मिळत आहे. या दहशदवाद्याकडून एके-47 व दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. या भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली आणि त्यांना यात पाहिलं यश आलं. या भागात अजूनही शोध मोहीम सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी यासंबंधित माहिती देत सांगितले की, ‘सुरक्षा दलांना या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर ही शोध मोहीम सुरू करण्यात आली. हंदवाडा विभागातील एका गावात सुरक्षा दलांनी लपून बसलेल्या दहशदवाद्यांना चारही बाजूने घेरले होते. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून त्याच्याकडून एके-47 आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. व बाकी दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
#Encounter has started at Krumhoora Zachaldara area of #Handwara. Police and security forces are on the job. Further details shall follow.@JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) March 17, 2025
जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, ‘हंदवाडा येथील क्रुम्हुरा भागात ही चकमक झाली. दहशदवादी या गावात लपून बसले होते. पोलिसांना जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी या गावाला चारही बाजूने वेढले होते. ज्यात पोलिसांना काही प्रमाणात यश आले आहे. असं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, 19 जानेवारी रोजी सोपोर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यावेळी सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांना घेरले होते. मात्र, दोन्ही दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर पोलीस शोध मोहीम राबवत होते. या मोहिमेअंतर्गत काल पोलिसांना यश आले असून, एक दहशदवादी मारला गेला आहे, मात्र, पोलिसांसोबत सुरु आलेल्या चकमकीत काही दहशतवाद्यांना पळून जाण्यात यश आले. पोलिसांकडून सध्या कारवाई सुरु असून, लवकरच लपलेल्या दहशदवाद्यांना पकडले जाईल. असे सांगितले आहे.