अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निर्णयांनी जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेने बदललेल्या धोरणांमुळे युरोपातील अनेक देश अडचणीत आहेत. अशातच आता फ्रान्सने अमेरिकन प्रशासनाला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी परत नेण्याची धमकी दिलीय. नेमकं काय घडलं पाहूया…
फ्रान्समधील समाजवादी आणि लोकशाही गटाचे नेते राफेल ग्लक्समैन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टॅरिफ (टॅरिफ लादणे म्हणजे, एखाद्या देशाने दुसऱ्या देशातून आयात होणाऱ्या मालावर विशिष्ट कर टॅरिफ लावणं) लादण्याच्या धमकीवर टीका केली आहे.
राफेल ग्लक्समैन म्हणाले की, ‘मी त्या अमेरिकन लोकांना सांगू इच्छितो ज्यांनी वैज्ञानिकांना कामावरून काढून टाकले आहे. ज्यांनी अत्याचार करणाऱ्यांना साथ दिली आहे. ते आमच्या ‘भेटी’च्या पात्र नाहीत. 1886 मध्ये भेट दिलेला ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ त्यांनी करावा. असं त्यांनी म्हंटल आहे.
फ्रान्सने स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तुम्हाला भेट म्हणून दिले आहे पण तुम्ही त्याची कदर करत नाही…आम्हाला ते परत करा. असं ते म्हणाले आहेत.
‘ट्रम्प प्रशासन चांगल्या लोकांना कमावरून काढून टाकत आहे. ज्या लोकांना ट्रम्प सरकारने कामावरून काढले आहे त्यांनी इथे युरोपात येऊन युरोपियन अर्थव्यवस्था वाढण्यास मदत करावी. ज्यांनी आपल्या आविष्काराने व कठोर परिश्रमाने अमेरिकेला जगातील आघाडीचा देश बनवले आहे अशा सर्व लोकांना जर तुम्ही कामावरून काढत असाल तर नक्कीच काढा. आम्ही त्यांचे युरोपमध्ये स्वागत करतो.’ असंही ते म्हणाले आहे.
दरम्यान, 28 ऑक्टोबर 1886 रोजी न्यूयॉर्क हार्बरमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’चे अनावरण करण्यात आले. अमेरिकन डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्सच्या शताब्दीच्या स्मरणार्थ फ्रान्सने ही भेट दिली होती. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची रचना फ्रान्सच्या फ्रेडरिक-अगस्टे बार्थोल्डी यांनी केली होती.