गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेतील एका उद्योगपतीचं नाव जगाच्या राजकीय पटलावर गाजत आहे ते म्हणजे जॉर्ज सोरोस. सोरोस यांनी नेहमीच दुसऱ्या देशांच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये ढवळाढवळ केली आहे. भारताबाबतीतही त्यांनी अशीच वक्तव्य केली आहेत. मग ते काश्मीर विषयी असो किंवा मग मोदींविषयी असो, त्यांनी नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविषयी वादग्रस्त विधानं करत भारतात अशांतता कशी पसरेल याची काळजी घेतली आहे. दरम्यान आता याच जॉर्ज सोरोस यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
भारत सरकारविरोधात नरेटिव्ह तयार करण्यासाठी फंडिंग केल्याच्या आरोपानंतर आता सोरोस यांच्याशी संबंधित संस्थांवर ईडीकडून छापे टाकण्यात येत आहेत. मंगळवारी ईडीने जॉर्ज सोरोस फाउंडेशन, ओपन सोरोस फाउंडेशन (OSF) आणि अॅम्नेस्टी सारख्या संस्थांवर छापा टाकला आहे.
ईडीने ही कारवाई परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) च्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केली आहे. सध्या, ओएसएफने छाप्यांबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
अॅम्नेस्टी आणि ह्यूमन राईट्स वॉच (HRW) वर ओपन सोरोस फाउंडेशन (OSF) कडून फंडिंग मिळाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने (CBI) यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. ओपन सोरोस फाउंडेशन (OSF) कडून मिळालेला निधी कशासाठी वापरण्यात आला. याची चौकशी ईडी करत आहेत.
अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस समर्थित ओपन सोसायटी फाउंडेशन आणि त्यांच्याशी संबंधित काही संस्थांविरुद्ध बंगळुरूमध्ये त्यांच्या 8 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.