नागपूरमध्ये काल औरंगजेबाची कबर हटवण्यावरून समाजविघटक जमावाने दगडफेक तसेच जाळपोळ केली आहे.यावेळी संतप्त झालेल्या एका गटाने सायंकाळी ७.३० नंतर नागपूर मधील महाल परिसरामध्ये तुफान दगडफेक करून गाड्यांची जाळपोळ केली.यावेळी पोलीस अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. तर या प्रकरणात ५० हुन अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच जाळपोळीच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे दिसून आले. मात्र या घटनेबाबतच्या समोर आलेल्या काही तपशिलांमधून आणि सीसीटीव्ही फुटेजमधून हा सुनियोजित कट होता अशी माहिती समोर आली आहे.
राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, की शस्त्रे, दगड आणि विशिष्ट घरांना लक्ष्य करणारा जमाव होता हे पोलिसांच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.
तसेच दंगल खोरांनी सीसीटीव्ही फॊडायचा प्रयत्न केला तरी सगळेच सीसीटीव्ही त्यांना फोडता आले नाहीत. आता त्या सीसीटीव्हीचे फुटेज आता उपलब्ध झाले असून त्यामध्ये दंगलखोर लाठ्या काठ्या तलवारी घेऊन कसे घुसले, त्यांच्या हातात पेट्रोल बॉम्ब होते. त्यांनी ठरवून घरे टार्गेट केली. अनेकांनी चेहरा झाकला असून दगडफेक करताना आणि पळताना दिसत आहेत.जेसीबी आणि गाड्यांची जाळपोळ केली हे देखील दिसून आले. आता सीसीटीव्ही मधून पोलिसांनी फुटेज गोळा केले. त्या फुटेजच्या आधारे कार्यवाही सुरू केली आहे.
दंगलीच्या जागेवर पोलिसांना ट्रॉलीभर दगड सापडले आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत.नागपुरात एकूण तीन ठिकाणी या घटनांचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, बेशिस्त जमावाने परिसरातील अनेक वाहनांना आग लावली आणि घरे आणि एका क्लिनिकची तोडफोड केली.क्लिनिकच्या समोर चहाची टपरी चालवणाऱ्या आणखी एका रहिवाशाने सांगितले की, जमावाने क्लिनिकमध्ये प्रवेश केला, सर्व टेबले फोडली आणि औषधे फेकून दिली. तसेच त्याने सांगितले की त्याच्या दुकानाचीही तोडफोड करण्यात आली आहे.
दरम्यान बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने पत्रकार परिषद घेत जाणूनबुजून अफवा पसरवत कट्टरपंथीयांनी ही दंगल घडवून आणल्याचा गंभीर आरोप केला आहे.