नागपूर हिंसाचार प्रकरणात आता नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या इथ तणावपूर्ण शांताता असून हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून नागपूर पोलिसांनी जवळपास 50 हून आरोपींना अटक करून गुन्हे दाखल केले आहेत. त्यातच आता हिंसाचाराशी संबंधित असलेल्या सुत्राधाराचे अटक करण्यात आले आहे, यामध्ये फहीम शमीम खान याचं नाव आघाडीवर एफआयआरनुसार फहीम शमीम खानने जमाव जमवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोण आहे फहीम खान
फहीम खान नागपूरमधील मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे. महत्वाचं म्हणजे हाच फहीम खान पोलीस स्टेशनला निवेदन देण्यास गेला होता.फहीम खाननेच सगळ्यातआधी सकाळी 11 वाजता 30 ते 40 जणांचा जमा केले आणि पोलिसांना निवेदन देण्यास गेला. यावेळी विहिंप आणि बजरंग दल कार्यकर्त्यांविरोधात आरोप फहीम खानने पोलिसांकडे केला. यानूसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतरदेखील फहीम खानने पुन्हा जमाव एकत्र केला आणि तणाव निर्माण करण्यास सुरुवात केली.
फहीम खान याचे वय ३८ वर्षे असून त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असल्याची माहिती समोर येत आहे.तो या प्रकरणात अडकण्याचे कारण म्हणजे तो संबंधित तरुणांना हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त करत होता. पोलीस हिंदु समाजाचे आहेत, आपली मदत ते करत नाही, असं सांगत फहीम खान आंदोलनकर्त्यांना भडकवत होता, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत फहीम खानने निवडणूक देखील लढवली होती. मात्र यामध्ये त्याचा पराभव झाला होता.
दरम्यान हा हल्ला सुनियोजित असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनीं देखील अशीच शंका उपस्थित केली होती. त्यामुळे आता या प्रकरण खरच पूर्वनियोजित होत का आणि यासाठी कोणी आर्थिक मदत केली आहे का याचा सुद्धा तपास नागपूर पोलीस आणि दहशतवादी पथक करणार असल्याची माहिती समोर येत आहे.