Bangladeshi Intruder News: राज्यात दिवसेंदिवस वाढणारे बांगलादेशी घुसखोरांचे प्रमाण हे सरकार समोरील एक मोठे आव्हान ठरत आहे. आता राज्य सरकारने या बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यातच गृह राज्यमंत्री योगेश कदम(Yogesh Kadam) यांनी विधानसभेत बांगलादेशी घुसखोरांबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
भाजपचे संजय उपाध्याय यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना यागेश कदम म्हणाले की, महाराष्ट्रातील बांगलादेशी घुसखोरांना जन्माचे दाखले, तसेच रहिवासी दाखले देणार्या अधिकार्यांवर सरकारने कठोर कारवाई केली आहे. मात्र यातील 99 टक्के घुसखोरांनी पश्चिम बंगालमधून कागदपत्रे तयार केलेली आहेत आणि ही सर्व कागदपत्रे दलालामार्फत तयार केली जात आहेत. परंतु या बांगलादेशी घुसखोरांना पश्चिम बंगाल सरकारचे साहाय्य नाही, असेही योगेश कदम यांनी स्पष्ट केले आहे. बांगलादेशी घुसखोरांबाबत केंद्रशासनाला कळवले आहे, असेही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेमध्ये सांगितले आहे.
बांगलादेशी घुसखोरांबाबत पश्चिम बंगालमध्येही परिस्थीती गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले. पश्चिम बंगालमध्ये घुसखोरांना अधिकृत आधारकार्डही मिळतात. सर्वप्रथम कुटुंबातील एक व्यक्ती आधारकार्ड बनवून घेतो. त्यानंतर हळूहळू संपूर्ण कुटुंबांचे आणि नातेवाईकांचे आधारकार्ड बनवून घेतले जाते. त्यामुळे ही बाब अत्यंत चिंतेचा विषय असल्याचेही योगेश कदम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनीही काही दिवसांपूर्वी बांगलादेशी घुसखोरांना सोडणार नाही, असा इशार दिला आहे. तसेच भाजप नेते किरिट सोमय्या(Kirit somaiya) यांनीही राज्यात बांगलादेशी विरोधात आघाडी उभारली आहे.