Disha Salian Death Case: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची ( Sushant Singh Rajput) माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिचा २०२० मध्ये बालकनीतून खाली पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची नोंद केली होती. मात्र तब्बल पाच वर्षांनी आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.
दिशा सालियनचे वडिल सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणी आता नव्याने चौकशी करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तिच्या वडिलांनी याचिकेत आदित्य ठाकरे(Aditya Thackeray), सूरज पांचोली, दिनो मोर्या आणि मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. दिशा करिअरबाबतीत खूप गंभीर होती, ती आत्महत्या करणे शक्य नाही. माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती आहे, असे मला त्यावेळी भासवण्यात आले. मात्र तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे, असे देखील तिच्या वडिलांनी याचिकेत म्हटले आहे.
विशेष म्हणजे या याचिकेत असाही उल्लेख आहे की, दिशावर झालेला बलात्कार आणि हत्या लपवून ठेवण्यासाठी सगळे पुरावे, आणि सगळे अहवाल त्यावेळी बनावट तयार केले गेले.
दिशाच्या ज्या रात्री मृत्यू झाला( 8 जून 2020) त्या रात्री ती तिच्या मालवणी येथील घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी करत होती. परंतु अचानक तिथे आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक, सूरज पांचोली, दिनो मोर्या झाले आणि त्यानंतर या पार्टीचा रंगच बदलला, असा जवाब तेथील त्या रात्रीच्या प्रत्यक्षदर्शींनी दिला आहे, असेही याचिकेत सतीश सालियन यांनी म्हटले आहे.