Swargate Rape Case: फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील शिवशाही बसमध्ये एका तरूणीवर बलात्कार झाला. त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे सध्या पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. ही घटना घडल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता की, पिडीत तरूणी बलात्कार करतेवेळी ओरडली का नाही. या प्रश्वावरून विविध प्रक्रिया उमटू लागल्या होत्या. मात्र आता याबाबत तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
ज्या शिवशाही बसमध्ये ही घटना घडली होती, त्या शिवशाही बसची शास्त्रोक्त तपासणी करण्यात आली. ज्या बसमध्ये ही घटना घडली त्या बसमधून आवाज बाहेर येतो की नाही, याची शास्त्रोक्त पडताळणी पोलिसांनी केली असता, मन हेलावून टाकणारी बाब समोर आली आहे. अत्याचारावेळी तरुणीने आरोपीला प्रतिकार केला होता. मोठ्याने आरडाओरडा करून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र बस वातानुकूलित असल्याने काचा बंद होत्या आमि त्यामुळे आवाज बाहेर ऐकू आला नाही.
काही दिवसांपूर्वी दत्ता गाडे आणि त्याच्या वकिलाने पीडितेवर गंभीर आरोप केले होते. पीडितीने दत्ता गाडेकडून पैसे उसने घेतले होते. दत्ता गाडे आणि पीडितेची आधीपासून ओळख होती, असा दत्ता गाडेच्या वकिलाने केला होता. मात्र पोलिसांनी याचीही सखोल चौकशी केली असता, दत्ता गाडे आणि त्याचा वकिल खोटे बोलत असल्याचे समोर आले होते.
दरम्यान,विशेष म्हणजे दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात वावरत असल्याची माहिती काही दिवसांपर्वी उघडकीस आली होती. पोलिसांचा गणवेश परिधान केलेले दत्तात्रय गाडेचे फोटो पोलिसांच्या हाती लागले होते.