मुंबईतील स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका विनोदी सादरीकरणादरम्यान कामरा यांने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली, तसेच एका व्यंग्यात्मक गाण्यात शिंदे यांना गद्दार असे संबोधून त्यांची खिल्ली उडवली. या कृत्यामुळे शिंदे यांच्या शिवसेना समर्थकांनी निदर्शने केली, संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कामरा यांच्या कार्यालयाबाहेर जमुन आणि त्याच्या वक्तव्याला उत्तर म्हणून कामरा यांच्या स्टुडिओची तोडफोड केली.
कोण आहे कुणाल कामरा ?
कुणाल कामरा हा एक प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आहे ज्याने २०१७ पासून त्याच्या यूट्यूब मुलाखतींद्वारे सर्वांचे लक्ष वेधले. तो त्याच्या मोठ्या प्रमाणात वायरल झालेल्या “शट अप कुणाल” या विनोदी कार्यक्रमासाठी प्रसिद्ध झाला. या कार्यक्रमाद्वारे त्याने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी आणि उमर खालिद, कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांसारख्या प्रमुख व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आणि लोकांच्या नजरेत त्याचे स्थान आणखी मजबूत केले.
वादाचा इतिहास आहे जुनाच
कामरा हा चिथावणीखोर टिप्पण्यांमुळे अनेकदा वादात सापडला आहे. अलिकडेच, त्यांचा ओलाचे संस्थापक भावेश अग्रवाल यांच्याशी जाहीर वाद झाला होता, जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर दिसून आला. एवढेच नाही तर कामरा हा भाजप नेत्यांचा विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा सतत टीकाकार राहिला आहे. त्याने अनेकदा भाजपवर टीका केली आहे .२०२० मध्ये विमान प्रवासादरम्यान त्याचा सर्वात हाय-प्रोफाइल वाद झाला होता त्याने हा वाद पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी घातला होता.ते दोघेही एकाच विमानातून प्रवास करत होते, यादरम्यान कामराने गोस्वामी यांच्यावर चुकीची टिप्पणी केली होती.ज्यामुळे इंडिगो, एअर इंडिया, गो एअर आणि स्पाइसजेटसह अनेक विमान कंपन्यांनी त्यांच्यावर सहा महिन्यांसाठी बंदी घात
सोशल मीडियाची लोकप्रियता
कुणाल कामरा याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड फॉलोअर्स आहेत. त्याच्या यूट्यूब चॅनेलवर २.३१ दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत, तर इंस्टाग्रामवर त्याचे फॉलोअर्स दहा लाख आहेत. कामरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर देखील सक्रिय आहे, जिथे त्याचे २.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. उल्लेखनीय म्हणजे,बाब म्हणजे तो कन्हैया कुमार, वरुण ग्रोव्हर आणि श्याम रंगीला सारख्या व्यक्तींसह फक्त १२ जणांना फॉलो करतो.
कुणाल कामराची संपत्ती किती?
कुणाल कामराची नेमकी एकूण संपत्ती अद्याप निश्चित झालेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार तो त्याच्या यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडियाद्वारे प्रत्येक शोसाठी १२ ते १५ लाख रुपये कमवतो. त्याची एकूण संपत्ती $११६,००० ते ६९६ कोटींच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे, जो भारतीय चलनात अंदाजे १ ते ६ कोटी रुपये होतो.