Maharashtra Assembly: सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज आरोप प्रत्योरोपाचे गणित पाहायला मिळत आहे. मात्र क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजूर झाला आहे.
राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल(Jaykumar Rawal) यांनी, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी, केंद्र सरकारला शिफारस करण्याचा ठराव विधानसभेत मांडला. त्यानंतर हा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
हा ठराव विधानसभेत मंजूर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी एक्सवरती पोस्ट करत म्हटले आहे की, हा ठराव ऐतिहासिक असून प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा तसेच भारतरत्न पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे.संपूर्ण देशवासियांच्या लोकभावनेचा आदर करणारा हा ठराव सर्वांनुमते मंजूर होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व विधीमंडळ सदस्यांचेही मी मनापासून आभार मानतो.
पुढे अजित पवारांनी पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, संपूर्ण देशवासियांच्या लोकभावनेचा आदर करणारा हा ठराव सर्वांनुमते मंजूर होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व विधीमंडळ सदस्यांचेही मी मनापासून आभार मानतो. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरु करुन स्त्रीशक्तीला शिक्षणाची दारं खुली करुन दिली. आज शेती, शिक्षण, ज्ञान, विज्ञान, संशोधन, अंतराळ, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रात महिला मोठ्या संख्येनं जबाबदारीच्या पदांवर काम करत आहेत. त्यांना ‘भारतरत्न’ देण्याचा महाराष्ट्र विधानसभेनं मंजूर केलेला ठराव हा लोकभावनेचा आदर करणारा आहे.