Kunal Kamra: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने स्टँड अप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर व्यंगात्मक टीका केली. त्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कुणाल कामरावर करावाईची मागणी केली जात आहे. त्यातच आता गृहराज्यमंत्री योगेश कदम(Yogesh kadam) यांनी याबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता कुणाल कामराचे सीडीआर तपासले जातील तसेच सर्व कॉल रेकॉर्डही तपासले जातील, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली आहे. तसेच त्याच्या बँक खात्याचीही चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी विधानसभेत दिली. तसेच याचा सुत्रधार दुसरा कोणी असेल तर त्याची देखील चौकशी केली जाईल, असे योगेश कदम म्हणाले.
सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तींवर अशा प्रकारची वक्तव्य केली जात असतील तर याबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. अजिबात कोणाला सोडले जाणार नाही. अशा प्रकारची स्टॅण्डअप कॉमेडी आम्ही चालू देणार नाही, असेही योगेश कदम यावेळी म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनीही कुणाल कामराला कारवाईचा इशारा दिला आहे.
दरम्यान, कुणाल कामराने एका गाण्यामध्ये एकनाथ शिंदेचे नाव न घेता त्यांना गद्दार म्हटले आहे. घराणेशाही संपवण्यासाठी त्यांनी कुणाचातरी बाप चोरला. शिंदे मंत्री नाहीत तर हे दलबदलू आहेत. मंत्रालयापेक्षा जास्त हे तर देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवरच जास्त असतात अशा शब्दात कुणाल कामरालाने शिंदेवर टीका केली होती.