लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आपल्या कारकिर्दीचे आठवे वर्ष साजरे केले. यासंदर्भात लखनऊमध्ये सरकारच्या आजवरच्या कामगिरीचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट केला नव्हता.पण त्यानंतर गोरखपूरचे पाच वेळा खासदार राहिलेल्या योगी आदित्यनाथ यांना भाजपने राज्याचे नेतृत्व करण्यासाठी निवडले. तेंव्हा योगी यांनी उत्तर प्रदेशात भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. तेंव्हाच्या विधानसभा निवडणूकीत भाजपने ४०३ पैकी ३१२ जागा जिंकल्या होत्या.
२०२२ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत, भाजपने २५५ जागा जिंकून पुन्हा एकदा सत्ता मिळवली, तेंव्हा त्यांच्या मित्रपक्षांनाही चांगल्या जागा मिळाल्या होत्या. या विजयामुळे योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशच्या इतिहासात सलग दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून काम करणारे पहिले व्यक्ती बनले.२०१७ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर, योगी आदित्यनाथ यांनी गृह, वित्त, सांख्यिकी, सैनिक कल्याण, गृहरक्षक दल, कार्मिक आणि नियुक्त्या आणि नागरी संरक्षण यासह अनेक प्रमुख खाती आपल्या नियंत्रणात ठेवली. सध्या ते गृह, नागरी विमान वाहतूक, कायदा आणि सुव्यवस्था, खाण आणि धार्मिक व्यवहार यासारख्या ३३ मंत्रालयांची देखरेख करत आहेत.
५ जून १९७२ रोजी उत्तराखंडमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव अजय सिंह बिश्त ठेवले. पण पुढे गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिराचे महंत अवैद्यनाथ यांचे शिष्य झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी नंतर त्यांचे धार्मिक नाव धारण केले. त्यांचा राजकीय प्रवास १९९८ मध्ये सुरू झाला जेव्हा ते गोरखपूरचे सर्वात तरुण खासदार बनले. त्यांनी २०१७ पर्यंत खासदार म्हणून काम केले आणि सलग पाच वेळा या प्रदेशाचे प्रतिनिधित्व केले.
रविवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणि आगामी सणांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी सण शांततेत आणि परंपरेनुसार साजरे केले पाहिजेत यावर भर दिला. याव्यतिरिक्त, आदित्यनाथ यांनी राज्य सरकारच्या आठ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये तीन दिवसांचा ‘जनपडिया विकास उत्सव’ साजरा करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यानी वाहतुकीवर देखरेख वाढवण्याची गरज देखील अधोरेखित केली, अधिकाऱ्यांना टेम्पो, ई-रिक्षा चालक आणि भाडेकरूंची पडताळणी करण्याचे निर्देश दिले. ओव्हरलोडिंगला आळा घालण्याचे आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हा टास्क फोर्समध्ये समाविष्ट करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शिवाय, त्यांनी पोलिसांना पायी गस्त वाढवण्याचे आणि राज्यभर पीआरव्ही ११२ युनिट्स सक्रिय करण्याचे निर्देश दिले.