Udhav Thackeray: विधानसेभत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरेंची(Udhav Thackeray) साथ सोडत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे चिंतेत आहेत. त्यातच त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटातील आणखी एक जेष्ठा नेता आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आहिल्यानगरमधील शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले (Sandesh Karle) हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्या म्हणजेच २६ मार्च रोजी मुंबईमध्ये ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीही आहिल्यानगरमधील ठाकरे गटाच्या काही पदाधिकारी आणि नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला पडत चाललेली खिंडार ठाकरेंसाठी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरेंना जड जाणार आहेत हे तर निश्चित.
ठाकरे गटातील नेत्यांचा शिवसेनेत होत असलेला प्रवेश हा ठाकरे पक्षबांधणीमध्ये फेल ठरले याचे उदाहरण म्हणता येईल. कारण अनेक नेत्यांनी आपआपल्या भागात पक्षाच्या बैठकींच्या अभावामुळे पक्ष सोडत असल्याचे सांगितले. लोकसभेत झालेल्या विजयात आणि सहानुभूतीचे राजकारण करण्यात ठाकरे इतके हरवून गेले की त्यांना आहे या नेत्यांना देखील जोडून ठेवता आले नाही.