Pune News : बस चालवताना मोबाईलचा वापर केला तर कडक कारवाईला समोरे जावे लागू शकते असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दिला आहे. नुकतीच एक घटना समोर आली होती. दादर येथून स्वारगेट (पुणे) साठी निघालेल्या खासगी ई-शिवनेरी बसमधील चालक 21 मार्च रोजी बस चालवताना क्रिकेट मॅच पाहत असल्याचं आढळून आलं होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर नागरिकांनी चिंता व्यक्त करत हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ असल्याचं म्हंटल होत. त्यानंतर बस ड्रायवर कारवाई करत त्याला निलंबित करण्यात आले होते.
यानंतर आता ‘पी एम पी एम एल’ने आपल्या कर्मचाऱ्यांना कडक सुचना जारी केल्या आहेत. त्यांच्या चालकांना आणि वाहकांना गाडी चालवताना मोबाईल फोन वापरणे, तसेच तंबाखू-पान मसाला यांचे सेवन करणे, अशा कारणांसाठी निलंबित केले जाऊ शकते. असे निर्देश दिले आहेत.
पीएमपीएमएलने त्यांच्या चालकांना कामावर असताना मोबाईल फोन वापरण्यास, हेडफोन घालण्यास किंवा तंबाखू आणि पान मसाला खाण्यास मनाई करण्याचे कडक निर्देश जारी केले होते. या नियमांचे उल्लंघन केल्यास दोन महिन्यांचे निलंबन केले जाईल परिपत्रकात म्हटले होते.
दरम्यान, पीएमपीएमएलने चालक किंवा वाहकांविषयीच्या तक्रारींसाठी व्हाट्सअॅप क्रमांक देखील जारी केला आहे. प्रवाशांना ता तक्रारींचे फोटो किंवा व्हिडिओ तसंच ज्या बसची तक्रार करायची आहे त्या बसचा क्रमांक पीएमपीएमएलच्या ‘complaints@pmpml.org’ या ईमेलवर पाठवता येणार आहे. तसंच 9881495589 या व्हाट्सअॅप क्रमांकावर तक्रार दाखल करता येणार आहे.