अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवसराज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामळे विधानसभेत आज काय घडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिवेशनाच्या या काळात अनेक मुद्दे चर्चेत आले. शिवाय धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामराने माफी मागावी असे म्हंटले. तसेच दिशा सालियान प्रकरणावर देखील चर्चा करण्यात आली. या सर्व प्रकरणावरून हे अधिवेशन चांगलेच गाजले.
महाराष्ट्रातील कायदा व्यवस्था, वाढती गुन्हेगारी या आणि अशा अनेक विषयावरून विरोधक आक्रमक झाले, तसेच यादरम्यान भाजप आमदार निलेश राणे आणि ठाकरे सेनेचे भास्कर जाधव यांच्यात वाकयुद्ध झालेले पाहायला मिळाले.
आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने आजही विविध प्रश्नांवर अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. संविधानावरील चर्चेबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज उत्तर देण्याची शक्यता असून त्याचबरोबर या अधिवेशनात किती विधेयके पारित झाली, याबाबतही माहिती मिळू शकते.तसेच आज अधिवेशन संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांची पत्रकार परिषद होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक या पत्रकार परिषदेमधून काय बोलतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.