महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी जोर धरत आहे. अशातच आता औरंगजेबाच्या कबर संरक्षणासाठी मुघलांचे वंशज पुढे आले आहेत. मुघल वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहित औरंगजेबाच्या कबरीच्या संरक्षणाची मागणी केली आहे. प्रिन्स याकूब हबीबुद्दीन मुघल कुटुंबांचे उत्तराधिकारी आहेत. त्यांनी कबरीच्या संरक्षणाच्या मागणीचे पात्र राष्ट्रपतींसह, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि स्थानिक पोलीस यंत्रणासह महत्त्वाच्या लोकांना पाठवलं आहे.
त्यांनी पत्रात लिहिलं आहे, ‘मी मुघल कुटुंबांचा उत्तराधिकारी. शेवटचे मुघल बहादूर शाह जाफर यांचा पणतू आहे. माझे पूर्वज बादशहा औरंगजेब यांची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांची कबर अत्यंत साधी आहे. गेल्या काही दिवसांपासून काही लोक ही कबर पडणायची मागणी करत आहे. मात्र औरंगजेब यांचा जन्म भारतात झाला आणि ते भारतातच मृत्यू पावले आहेत. सध्या औरंगजेबाची कबर वक्फची संपत्ती आहे आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिपत्याखाली आहे. मी राष्ट्रपती महोदय यांच्या लक्षात आणून देत आहे की, मी औरंगजेबाची कबर असलेल्या जागेचा मुतवल्ली (वक्फ किंवा मशिदीच्या किंवा त्या संपत्तीचा प्रमुख) आहे. मी त्याचा संरक्षक आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की, या संपत्तीचं महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने संरक्षण करावं. तसंच याबाबत योग्य ते आदेश तातडीने संबंधित यंत्रणांना द्यावेत. असं त्यांनी आपल्या पत्रात लिहलं आहे.
खरं तर गेल्या काही दिवसांपासून मुघल बादशाह औरंगजेब याचा छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या कबरीचा मुद्दा चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर तिथून हटवण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे.