PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात रामेश्वरम दौरा करतील. रामनवमीनिमित्त त्यांच्या हा दौरा खास असेल. राम नवमी एप्रिल महिन्यात सहा तारखेला असून, पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूच्या रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिरात पूजा होणार आहे. रामेश्वरममधील जगप्रसिद्ध रामनाथस्वामी मंदिर तामिळनाडूतील रामेश्वरम बेटावर उभारलेले आहे. हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते.
या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंबन पुलाचे देखील उद्घाटन करण्यात येणार आहे. पीएम मोदी यांनी साल 2019 मध्ये या पुलाच्या पुनर्विकास योजनेचे भूमीपूजन केले होते.
रामनवमीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र श्रीलंकेचा दौरा करतील. त्यांच्या हा दौरा दोन दिवसांचा असेल, चार, पाच तारखेला पंतप्रधान श्रीलंकेच्या दौऱ्यावर असतील.
मोदींच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या पंबन पुलाचे वैशिष्ट्ये काय?
पंतप्रधानांच्या हस्ते ज्या पुलाचे उद्घाटन होणार आहे तो पुल देशातील पहिला वर्टिकल सी ब्रिज असणार आहे. नवीन पंबन पुल २.५ किलोमीटर लांबीचा आहे. पूल सहा एप्रिलपासून प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. या पुलामुळे वाहतूक सोपी होणार आहे.
नव्या पंबन ब्रिजला नव्या तंत्रज्ञानाने पुनर्विकसित केले आहे. ज्यामुळे मोठी जहाजे पुलाखालून आरामात जाऊ शकणार आहेत. जुना ब्रिज साल 1914 मध्ये बांधला होता. पण पुलाच्या दुर्व्यवस्थेमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पुलाचे पुनर्वसन करण्यात आले. आता पूल नवीन तंत्रज्ञाने सुसज्ज असणार आहे. 1914 पासून आतापर्यंत हा ब्रिज रामेश्वरम बेट आणि मुख्य भारत बेटातील महत्वाचा दुवा आहे.